भंडारा : मतदान यंत्रातील बिघाडामुळे गाजलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी मारल्याचे चित्र असून, भाजप पिछाडीवर आहे.
नाना पटोले यांनी राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने पोटनिवडणूक झाली होती. भंडारा-गोंदियामध्ये तब्बल 18 उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे आणि भाजपचे हेमंत पटेल यांच्यात मुख्य लढत आहे. आज (गुरुवार) मतमोजणी होत असून, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रमुख लढत पहायला मिळत आहे. सातव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसने 2837 मतांनी आघाडी घेतली आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात बुधवारी पुन्हा 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले होते. या मतदान केंद्रांवर जवळपास 40 हजार मतदार होते. त्यापैकी जवळपास 65 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाच्या दिवशीही अनेक मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे ही निवडणूक मतदान यंत्रांमुळेच जास्त गाजली होती.

from News Story Feeds https://ift.tt/2IXdR9L
Comments
Post a Comment