आरोग्य म्हणी Ι ताक पिण्याचे हे १० फायदे जाणून घ्या Ι

आरोग्य म्हणी

. खाल दर रोज गाजर-मुळे, तर होतील सुंदर तुमचे डोळे...
. सकाळी नाश्ता करावा मस्त, मोड आलेले धान्य करावे फस्त...
. डाळी भाजीचे करावे सूप, अखंड राहील सुंदर रूप....
. तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त, आरोग्य तुमचे ती राखेल मस्त....
. जवळ करा लिंबू संत्री, दूर होईल पोटातील वाजंत्री...
. पपई लागते गोड गोड, पचनशक्तीला नाही तोड.....
.पालेभाज्या घ्या मुखी; आरोग्य ठेवा सदा सुखी.....
. भेसळयुक्त अन्न खाऊ नका; आरोग्य धोक्यात आणू नका....
. दररोज एक फळ खावू या; आरोगयाचे संवर्धन करु या....
१०. भोजनोत्तर फळांचा ग्रास; थांबवेल आरोग्याचा ह्रास....
११. प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार; आहारात  यांचे  महत्व फार...
१२. हिरवा भाजीपाला खावा रोज; राहील निरोगी आरोग्याची मौज...
१३. जेवणा नंतर केळी खा; पाचनशक्तीला वाव द्या.... 
१४. साखर तूप (बाजारचे )यांचे अति सेवन करु नका, मधुमेह लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका....
१५. खावी रोज रसरशीत फळे; सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे....
१६. गालावर खेळते सदा हास्य, फळे भाज्यांचे आहे ते रहस्य...
१७. पपई, गाजर खाऊ स्वस्त, डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त...
१८. सुखा मेवा ज्यांचे घरी, प्रथिने तेथे वास करी.. .
१९. भाज्या जास्त वेळ शिजवू नका, जीवनसत्वांचा नाश करु नका...
२०. जो घईल सकस आहार, दूर पळतील सारे आजार....
२१. भाजीपाल्याचं एकच महत्व, स्वस्तात मिळेल भरपूर सत्व....
२२. शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग, तिचा पाला तिच अंग, सत्व आहे तिच्या संग....
२३. कळणा कोंडा खावी नाचणी, मजबूत हाडे कांबी वाणी ..


ताक पिण्याचे हे १० फायदे जाणून घ्या

शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान आणि सुधृद होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा तरतरीत होतो.
ताकत विटामिन ” B 12 ” , कैल्शियम , पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात ते ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.

ताक पिण्याचे हे १० प्रकारचे फायदे जाणून घेऊया. कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . .
) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.  
) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो
) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात
) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
) थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.  
) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते
) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो
9) लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज चमचे असे दिवसभरातून - वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास काम होतो.
१०) महत्वाचे म्हणजे तीन दिवस ईतर काहीही खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. ज्यांनी ह्या पूर्वी रू 5000 देऊन पंचकर्म केलेल आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा तेव्हा लक्षात येईलच. तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महीन्यात ऐक वेळ करा, आपनास होनारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होनारा त्रास औषधी खर्चही वाचेल.

चला तर मग ताक पिण्यास सुरुवात करूयात. आज पासून Cold Drinks बंद करूया..
हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावी.

 


 

Post a Comment

My Instagram

Copyright © Latest News Worldwide. Made with by OddThemes